कै. विजयाताई हरी गांवकर हे एक असं नाव... ज्यांनी आपल्याला आयुष्यभर मुलांच्या शिक्षणासाठी वाहून घेतले. त्यांचा ठाम विश्वास होता की, मुलांना चांगल्या प्रतीचे शिक्षण दिले पाहिजे आणि त्यांच्या सुरुवातीच्या वर्षात उच्च मूल्ये त्यांच्या मनात रुजवावीत त्यामुळे तरुणांच्या मनावर कायमचा ठसा उमटेल.
विजयाताई यांचा जन्म हा दिनांक ३ ऑक्टोबर १९२९ रोजी मालवण येथील तारकर्ली येथे झाला त्यांचे लग्नापूर्वीचे नाव मीराबाई नरे असे होते. त्यांनी प्राथमिक शिक्षण पोयबावडी म्युनिसिपल शाळा परेल येथून घेतले आणि डॉ. शिरोडकर हायस्कूल परेल येथून त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण झाले.
१९४५ आली विजयाताईंचा विवाह शिक्षणतज्ञ हरी धर्माजी गांवकर यांच्या सोबत झाला. गांवकर सरांच्या शैक्षणिक कार्यात विजयाताईंनी स्वतःला देखील झोकून दिले.
१९५५ साली के एम एस शिशु विकास तसेच प्रायमरी परेल विभागाच्या त्या संचालिका झाल्या.
१९५६ साली विजयाताई या बी.ए. उत्तीर्ण झाल्या.
क्षा.म.समाजातील महिलांना एकत्र आणण्यासाठी आणि महिलांनी चूल-मूल या समीकरणातच न राहता समाजकारणात येणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन त्यांनी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजात महिलांची संघटना स्थापन केली. महिलांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी महिला संघटनेद्वारे आनंदमेळावा, कोजागिरी पौर्णिमा, मातृदिन, हळदीकुंकू समारंभ, सत्संग, कलाकुसर तसेच पाककलाकृती सादर करता यावी यासाठी पाककला स्पर्धा, तसेच महिलांची शैक्षणिक सहल आणि महिलांनी लेखन क्षेत्रातही पुढे यावे याकरिता प्रेरणा सारखा वार्षिक अंक आदि उपक्रम देखील त्यांनी सुरू केले.
१९७५-७६ साली विजयाताई यांना महाराष्ट्र शासनाकडून आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
१९७७ साली डॉ शिरोडकर एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेतदेखील त्यांचा मौलाचा सहभाग होता.
विजयाबाईंनी बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग असणाऱ्या मुलांसाठी देखील स्पेशल स्कूलची स्थापना केली.
विजयताईंना स्वतःचे मूल नव्हते पण त्या डॉ शिरोडकर शिक्षण संस्थेतील प्रत्येक मुला-मुलींसाठी त्या ताई पेक्षा एक आई बनल्या. पालक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी त्या मातृतुल्य होत्या. त्यांचा शब्द म्हणजे सर्वांसाठी आदेशाप्रमाणे असायचा. त्यांनी या क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज आणि डॉ शिरोडकर शिक्षण संस्थेला आपल्या कुटुंबाप्रमाणे प्रेम दिले.
महिलांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्यात सहभाग घ्यावा असे त्यांचे ठाम मत होते आणि त्याकरिता त्या महिलांना सतत मार्गदर्शन करीत असतं.
विजयाताईंनी फक्त मुंबईतच नाही तर ग्रामीण भागात देखील तेवढेच कार्य केलेले आहे.
मुंबई बोरिवली येथील शिक्षणतज्ञ ह. ध. गांवकर शैक्षणिक संकुल उभारण्यात देखील त्यांचा मौलाचा सहभाग आहे.
त्यांचे पती ह. ध. गांवकर साहेबांच्या निधनानंतर देखील त्यांनी आपल्या कामात कमतरता आणली नाही.
क्षा. म. समाजाच्या कार्यकारिणीत महिलांनी सहभाग घेऊन समाजाला प्रगतीपथावर न्यावे असे त्यांचे ठाम मत होते.
पण ही समाजमाता २३ मे, २००४ साली अनंतात विलीन झाली. आज विजयाताईंना जाऊन १७ वर्षे झाली पण त्यांच्या शिकवणीवर आज देखील सर्व महिला वर्ग कार्यरत आहेत.
आज मला हा लेख लिहिताना माझ्या डोळ्यासमोरच्या विजयाताई गांवकर आठवल्या. ज्यांचा सहवास मला लहानपणापासून मिळाला.
अशा या माझ्या समाजमातेला माझ्या माऊलीला त्यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त क्षा.म. समाज व डॉ शिरोडकर शिक्षण संस्थेतर्फे विनम्र अभिवादन...
ॲड. भक्ती चंद्रकांत जोगल
सरचिटणीस
Excellent Bhakti ji..... Lovely blog
ReplyDeleteधन्यवाद 🙏
DeleteThis comment has been removed by the author.
Deleteफारच छान ताई
ReplyDeleteधन्यवाद 🙏
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteक्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या समाजमाता, के एम एस शिरोडकर शाळेच्या, "कै. विजयाताई गांवकर" 🙏
ReplyDeleteमॅडम चा वाढदिवस आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी, त्यामुळे शाळेत असताना स्टाफ रूम मध्ये त्यांच्या खोलीत त्यांना गुलाब द्यायला जायचे. आता राहिल्या त्या मॅम सोबतच्या...गप्पा टप्पा आणि अजून सुंदर आठवणी....💐
खूप सुंदर लेख मॅम!👍💐
आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
धन्यवाद 🙏
Deleteखुपच छान..
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteगांवकर मॅडम विषयी इतकी माहिती मला नव्हती...पण भक्ती तुझ्या या लेखातून त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांना शिक्षणाविषयीचा असलेला ध्यास,सर्वांना जोडून ठेवण्याचं त्यांचं कसब,स्रियांना ख-या अर्थाने सक्षम करणारी एक अद्वितिय शक्तीच होत्या...त्यांच्या शाळेत मी शिकलोय याचा मला अभिमान आणि विशेष आनंद वाटतो..अशा या विभूतीस माझे कोटी कोटी प्रणाम!
ReplyDeleteभक्ती तुझ्या या लेखनास खूप खूप धन्यवाद..आणि असंच उत्तम लिखाण तू करत राहो..हीच मनोकामना..धन्यवाद!
धन्यवाद 🙏
Deleteभक्ती ,विजया ताईन बद्दल तू खूप छान लेख लिहिला आहेस असेच उत्तम लिखाण करीत रहा. अभिनंदन.
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteविजया ताई न्हवे आई होत्या साक्षात सरस्वती. प्रेमाचा झराच जाणू. सर्वाना सामावून समझून घेण्याची ताकद, लहान मुलांबरोबर त्यांचा कलेने राहणे.
ReplyDeleteईश्वर अशा माते ना सर्व शाळेत, कॉलेजात पाठवू देत.
राजेश देसाई
माजी विद्यार्थी
धन्यवाद 🙏
ReplyDelete