"कै. डॉ. अंकुश शंकर गावडे यांचा अल्पपरिचय"

 

 

कै. डॉ. अंकुश शंकर गावडे यांचा अल्पपरिचय

     ११ जून १९११ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा या गावी जन्म झाला. अंकुश शंकर गावडे यांचे शिक्षण हे B.A.(Hons.)B.T., PH.D.(Leeds.) पर्यंत झाले.

          १९४८ मध्ये इंडियन इन्टिट्युट ऑफ एज्युकेशनची स्थापना केली व संस्थेचे पहिले रजिस्ट्रार झाले. ते कोल्हापूर जिल्हातील श्री मौनी ग्रामीण विद्यापीठाचे पहिले संचालक झाले. तेथे त्यानी १९५२ ते १९५५ पर्यंत कार्य केले. त्यांनी गारगोटी परिसरात ९७ खेड्यांचा शोधक मागोवा घेऊन ४७ व्हालेंटरी प्रायमरी शाळा (स्वयंसेवी प्राथमिक शाळा) आणि २१ को. ऑ. सोसायट्या (सहकारी पतपेढ्या) सुरु केल्या. बेडी गावातील धनगरांसाठी सरकारकडून - ६० एकर जागा मिळविली आणि त्यांचे पुनर्वसन केले आणि त्यांच्यासाठी तेथेच शाळा काढली.

          १९५५ ते १९६० या काळात क्षा. म. समाज शिक्षण संस्था, मिठबांव, पंचक्रोशी जिल्हा सिंधुदूर्गचे पहिले संचालक म्हणून त्यांनी काम ही केले. त्या काळात गावासाठी श्रमदानाने रस्ते तसेच लायब्ररी, हॉस्पिटल, सहकारी सोसायट्या, खार जमिनींचा विकास, फळबागा असे विविध कार्यक्रम यशस्वीरित्या राबविले.

१९६० साली शिवाजी शिक्षण संस्था, मुंबईची स्थापना केली पंतनगर, घाटकोपर येथे औघौगिक कामगार वस्तीत मल्टिपरपज टेक्निकल हायस्कूल सुरू केले व गरीब विद्यार्थ्यांसाठी परेल येथे नाईट हायस्कूल सूरू केले. आजही घाटकोपर स्थानकापासून पायी ५ मिनिट अंतरावर साडेतीन एकर जमिनीवर (संपूर्ण क्षेत्रफळ १२९४२.१५ चौ. मिटर) शिशुविकास ते बारावी पर्यंन्त मराठी माध्यमाचे  तर  K. G.  ते दहावी पर्यंन्त इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यात येते.  ( माध्यमिक व उच्च माध्यमिक तांत्रिक विषयासह तसेच रात्र महाविद्यालयासह) सर्व शिक्षण विभागात ५५०० पेक्षा अधिक विद्यार्थी  शिक्षण घेत आहेत.

गावडे साहेबांनी संस्थेचे चिटणीस, अध्यक्ष आणि संचालक म्हणून सन १९६० ते १९८८ पर्यंत काम केले. डॉ. अंकुश शंकर गावडे हे १३ एप्रिल, १९८८ रोजी अनंतात विलीन झाले.

वरील माहिती श्री शरद फाटक, चेअरमन, शिवाजी शिक्षण संस्था यांच्या मदतीने उपलब्ध करण्यात आली आहे कृपया याची नोंद घ्यावी....

अशा या आपल्या क्षा म. समाजाच्या सुपुत्रास आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. डॉ. अंकुश शंकर गावडे यांच्या ११० व्या जयंती निमित्त त्यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन...

 

ॲड. भक्ती जोगल

      सरचिटणीस

क्षा. म. समाज, मुंबई

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

                                                                                                                                                                   

No comments:

Post a Comment

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या समाजमाता "कै. विजयाताई गांवकर"

        कै. विजयाताई हरी गांवकर हे एक असं नाव... ज्यांनी आपल्याला आयुष्यभर मुलांच्या शिक्षणासाठी वाहून घेतले. त्यांचा ठाम विश्वास होता की...