विद्यादानाचे अविरत कार्य करणाऱ्या, कोलंबसाच्या गर्वगीतात म्हटल्याप्रमाणे, अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा किनारा तुला पामराला“ असे म्हणत थोर शिक्षणमहर्षी कै. डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर सरांनी ६ जून १९३९ मध्ये स्थापन केलेल्या क्षा.म.स. शिक्षण संस्थेचे शिक्षणक्षेत्रातील कार्य मोलाचे आहे. डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांचा जन्म १८९० साली स्वातंत्र्य चळवळीत मीठाच्या सत्याग्रहामुळे अखिल भारतात प्रसिध्दीस आलेल्या शिरोडा या गावी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. लहापणीच त्याच्या आई वडीलांचे निधन झाले मोठ्या भावाकडून प्रतीपालन व शिक्षणास मदत झाली. परंतु सावंतवाडी येथे माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यांच्या मोठ्या भावाचे निधन झाले आणि त्यामुळे डॉ. मुंबईस प्रयान केले उदर निर्वाह व शिक्षण यासाठी लहानसहान नोकरी करत शिक्षणपुढे चालू ठेवले. मॅटरीकच्या परीक्षेमध्ये त्यांना उत्तम यश मिळाले व त्यामुळे त्यांना सरकारी शिक्षवृत्तीही मिळाली. १९१८ साली मुंबई विश्व विद्यालयाची बी. एस. सी ची परीक्षा प्रथम क्रमांकानी उत्तीर्ण झाले आणि यांच वर्षी मुंबईच्या सोशल सर्व्हिस लिंग मध्ये ते सामील झाले. त्यावेळी मुंबई शहरात चालू असलेल्या शितज्वाराच्या भंयकर साथीच्यावेळी एक स्वयंमसेवक पथक उभारून कामागार वस्तीत मदत कार्य देखील त्यांनी सुरू केले. तसेच गिरणी कामगारांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी व त्यांना काटकसरीची सवय लागावी म्हणून क्षा.म.स. परस्पर सहकारी पतपेढीची स्थापना देखील त्यांनी केली. १९२० साली श्री. शिवाजी नावाचे वर्तमानपत्र काढले व बालविवाह, खर्चाची उधळपट्टी, दारूबाजी व जुगारबाजी या सामाजिक दोषांविरुध्द प्रचार देखील केला. १९२८ साली डॉक्टरांची पदार्थविज्ञानाचे प्रोफेसर म्हणून कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये नेमणूक करण्यात आली. त्याचवेळी कोल्हापूरच्या व्हिक्टोरिया मराठा वसतिगृहाचे रेक्टर म्हणूनही त्याच्यावर जबाबदारी आली. १९३० साली जत संस्थानच्या महाराजांनी डॉक्टरांना उच्च शिक्षणासाठी मदत केली आणि डॉक्टरांनी लीडस् युनिव्हर्सिमध्ये पदार्थ विज्ञानाच्या उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला प्रयाण केले. १९३२ साली लीडस् विश्वविद्यालयाची पी. एच. डी. पदवी त्यांना प्राप्त झाली. त्यांनी मायभूमीला परतल्यावर बहुजन समाजामध्ये शिक्षण प्रचारासाठी मुंबई हे कार्यक्षेत्र करण्याचे ठरविले. १९३४ साली मुंबईच्या झेव्हियर कॉलेजमध्ये पदार्थ विज्ञानाचे प्रोफेसर म्हणून नोकरी व गिरगावातील मध्यमवर्गीय लोकवस्तीत श्री. पी. के. सावंत व इतर सहकारी यांच्या मदतीने एका माध्यमिक शाळेची स्थापना केली. १९३५ साली मुंबईमध्ये परेल या भागात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज या संस्थेची स्थापना केली. कामगारवस्तीमध्ये एका भाड्याच्या जागेत विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले व परेलमध्ये इंग्रजी शाळा काढण्यासाठी निधी जमविण्यास सुरूवात केली. ०६ जून, १९३९ रोजी पूर्वीचे गिरणगांव म्हणून ओळख असलेल्या परेल मध्ये इमारत बांधून के. एम. एस. परेल हायस्कूल या नावाने ही माध्यमिक साळा सुरू केली. याच वर्षी डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांची मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. परिस्थितीमुळे ज्यांना नोकरी करणे भाग आहे, अशा मुलांसाठी १९४० साली त्यांनी रात्रशाळा सुरू केली. १९४१ साली डॉक्टरांची मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणसमितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. प्राथमिक शिक्षकाच्या प्रशिक्षणासाठी ट्रेनिंग कॉलेज सुरू केले. १९४२ साली ‘चलेजाव चळवळीत’ त्यांनी सहभाग घेतल्यामुळे त्यांना अटक देखील करण्यात आली व ६ महिन्यांचे कारागृहवास ही त्यांना झाला. १९४५ साली ग्रामीण विभागामध्ये शिक्षण प्रसार व ग्रामीण विकास कार्याचे केंद्र या उद्देशाने पूर्वीते रत्नागिरी व आताचे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मिठबांव येथील मिठबांव एज्युकेशन सोसायटीने चालविलेली “श्री रामेश्वर इंग्लीश स्कूल” ही संस्था प्रयोगादाखल ताब्यात घेतली. १९४७ साली स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या निवडणूकीत डॉ. साहेब एका बाय इलंक्शनमध्ये परेल विभागातून महाराष्ट्र विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी परदेशी उच्च शिक्षणासाठी एक निधी चालू केला व श्री. एच्.डी.गांवकर यांना उच्च शिक्षणासाठी त्यांना इंग्लडला पाठविले. १९४८ साली डॉ. शिरोडकर सरांना कॅन्सर या रोगाने त्यांना आपल्या विळख्यात घेतले व १८ डिसेंबर १९४८ रोजी डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर सरांनी जगाचा निरोप केला. पूर्वीचे गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परळमधील सर्वसामान्यांच्या, गिरणीकामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे आणि एक सक्षम समाज निर्माण करण्याचे ध्येय साकार व्हावे यासाठी उभारलेल्या या शिक्षणसंकुलात विद्याथ्यार्ंच्या विविधांगी कौशल्यविकासाकडे येथील प्रत्येकाचेच लक्ष असते. विद्यार्थी हितासाठी हे विद्येचे मंदीर चार स्तंभांवर उभे आहे. त्यातील पहिला स्तंभ म्हणजे संस्थाचालक दुसरा स्तंभ म्हणजे मुख्याध्यापक, तिसरा स्तंभ म्हणजे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि चौथा स्तंभ म्हणजे पालक. या चारही स्तंभांवर असे हे विद्येचे मंदीर आजही अवरितपणे कार्यरत आहे.त्यांच्यात एक घट्ट वीण तयार झाली आहे. ही शृंखला एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ“ या उक्तीप्रमाणेच कार्यरत राहून शिक्षणक्षेत्रातील डॉ. शिरोडकरांच्या शिक्षणसंस्थेचे नाव कायमच अत्युच्च ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत व या पुढे ही करीत राहू. डॉ. शिरोडकरांच्या पश्चात सर्व शिक्षण संस्थाचा विस्तार थोर शिक्षणतज्ज्ञ कै. ह. ध. गांवकरसरांनी आपल्या हयातीत केला. त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी सौ. विजयाताई गांवकर यांनी देखील त्यांना मोलाची साथ दिली. या दोघांनी आपले संपूर्ण जीवन क्षा.म.शिक्षण संस्थेसाठी समर्पित केले. या संस्थेतून अनेक विद्यार्थी घडविले. आज एक शैक्षणिक प्रयोगशाळा म्हणून असलेला या वास्तुचा नावलौकिक वाढविण्यात डॉ.शिरोडकरांचे उत्तराधिकारी थोर शिक्षणतज्ज्ञ ज्ञानशक्ती व विचारशक्ती तसेच अध्यात्माचे संघटक कै. एच. डी. गांवकर सर यांचा मोलाचा वाटा आहे. या शिक्षणसंस्थेचे येथील घटकाचे शिक्षक, विद्यार्थी, क्रमचारी यांना स्वbविकासाबरोबर समाजविकासाच्या वाटेवर नेणारे, नवनविन प्रयोग करण्याचे दृष्टीकोन देणारे ह.ध.गांवकर सर होते.
आपण ही सर्वांनी कायमचे आमच्या सोबत राहून या पवित्र विद्यादानाच्या कार्यात सहभागी होऊन डॉ. शिरोडकर सरांच्या या ज्ञानपिठाचा आलेख उत्तुंग करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करावे.
कै. डॉ. रा. का. शिरोडकर यांच्या ७३ व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...
ॲड. भक्ती चंद्रकांत जोगल
सरचिटणीस,
क्षा.म.स शिक्षणसंस्था, मुंबई
No comments:
Post a Comment